मुंबई । भाजपचे प्रख्यात नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश अखेर निश्चीत झाला असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. खडसे यांच्याकडे पक्षातर्फे मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
भाजपचे बलाढ्य नेते
भाजपचे बलाढ्य नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाला असून याची औपचारीक घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष मोठी जबाबदारी टाकणार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे
भाजपचे मातब्बर नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. २०१६ साली लागोपाठ काही दिवसांमध्ये आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर पक्षाने त्यांचे पुनर्वसन तर केले नाहीच, पक्षाने सातत्याने त्यांची उपेक्षा केली. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकिट नाकारून त्यांच्या मुलीस तिकिट देण्यात आले. मात्र त्यांच्या पराभव झाल्याने खडसे संतप्त झाले असून त्यांनी सातत्याने पक्षावर टीका केली होती.
मागील दोन महिन्यांपासून
मागील दोन महिन्यांपासून एकनाथराव खडसे हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. काही दिवसांपूर्वी यासाठी शरद पवार यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील नेत्यांचे मत जाणून घेतले होते. यानंतर त्यांना शिवसेनेनेही ऑफर दिल्याची चर्चा होती. खडसे हे पक्ष बदलणार पण ते नेमके कुठे जाणार याबाबतची माहिती समोर आली नाही. आता मात्र ते हातावर घड्याळ बांधणार असल्याचे निश्चित झाले आहे.