यावल (रविंद्र आढाळे) – यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात महसुलच्या भरारी पथकाने धडक कारवाई करिता तापी नदीच्या पात्रातून अवैध मार्गाने वाळू वाहतूक करताना एक ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे महसुलच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफि धाबे दणाणले आहे.
डांभुर्णी तालुका यावल येथे आज ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, निवास नायब तहसीलदार आर के पवार ,आणि फैजपुर मंडळचे तलाठी प्रशांत जावळे ,आमोद येथील तलाठी एम .पी. खुर्दा. आडगावचे तलाठी आर.के. गोरटे. वाहन चालक हिरामण सावळे. यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ट्रॅक्टर मालक साहेबराव मच्छिंद्र दर सोळुंके कोळन्हावी यांच्या मालकाचे ट्रॅक्टर क्रमांक ,(एम एच १९ एपी७४९७) ट्रॉली चा क्रमांक नाही याव्दारे तापी नदीच्या पात्रतुन अवैधारित्या वाळूची वाहतुक करतांना आढळून आले आहे महसुलच्या पथकाने कारवाई करित ट्रॅक्टर ताब्यात घेवून यावल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे दरम्यान यावल तालुक्यात ही बऱ्यात ठिकाणी बेकायदेशीर वाळ्ची वाहतुक होत असत्याने त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे