Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महामार्गाच्या नूतनीकरणाचा ग्रामीण भागासह कॉलनीतल्या नागरिकांना होणार लाभ

by Divya Jalgaon Team
March 7, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
महामार्गाच्या नूतनीकरणाचा ग्रामीण भागासह कॉलनीतल्या नागरिकांना होणार लाभ

जळगाव – खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वार पर्यंत महामार्गाच्या नूतनीकरणाचा लाभ ग्रामीण भागासह जळगावातील कॉलनी परिसरातील जनतेला होणार असून या माध्यमातून गत निवडणुकीच्या काळात दिलेल्या वचनाची पूर्ती होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तर गिरणेवरील नवीन पुलाचे काम सुध्दा लवकरच मार्गी लागणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. आज ना. पाटील यांच्या हस्ते नूतनीकरणाच्या कामाचे उदघाटन झाल्यानंतर ते बोलत होते.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गावरील खोटेनगर ते पाळधी बायपास व अजिंठा चौफुली ते तरसोद प्रवेशद्वार पर्यंत नूतनीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी बांभोरी प्र.चा. आणि खोटेनगर स्टॉप येथे करण्यात आले.

जळगाव शहरातून जाणार्‍या सुमारे आठ किलोमिटर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा पाळधीतून एक मार्ग वळवण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उर्वरित सुमारे ४ किलोमिटर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच या मार्गावरील वीज खांब व इतर उपकरणांचेही स्थलांतर करण्यात येणार आहे. या दोन्ही कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या दोन्ही कामांसाठी १२ कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून याचे काम आजपासूनच सुरू करण्यात आले आहे.

आश्‍वासनाची वचनपूर्ती

या कार्यक्रमात बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गाचे रूंदीकरण सध्या सुरू आहे. तथापि, खोटेनगर स्टॉप ते पाळधी बायपास आणि कालींकामाता मंदिर ते तरसोद प्रवेशद्वार या मार्गाचा यात समावेश नव्हता. यामुळे पालकमंत्री या नात्याने आपण या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी १२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून यामुळे या महामार्गावरील रहदारीला होणारा अडथळा दूर झाला आहे. यात खोटेनगर ते पाळधीपर्यंतचा रस्ता हा अतिशय अरूंद असून याला आधी अर्थिक तरतूद नव्हती. मात्र आता याबाबत पाठपुरावा करून हे काम आजपासून सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीत आपण महामार्गाच्या रूंदीकरणाची वचन दिले होते. आजपासून याची पूर्तता होत असल्याचे प्रतिपादनही ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

गिरणेवरील समांतर पुलाचे कामही लवकरच होणार

दरम्यान, गिरणा नदीवर असणार्‍या पुलाच्या समांतर एक नवीन पूल उभारणीच्या कामाचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३० कोटी रूपये लागणार असून या पुलासाठी लवकरच मान्यता मिळेल असा आशावाद देखील ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. यामुळे महामार्गावरील रहदारीची अडचण दूर होणार असल्याचे प्रतिपादनही ना. पाटील यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार सा.बा.चे शाखा अभियंता जितेंद्र महाजन यांनी मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सा.बा. तर्फे व कॉन्टॅक्टर राहुल सोनवणे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , महापौर भारती ताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व मान्यवरांचा शाल श्रीफळ व गुलाबबुके देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे , पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, मनपा गटनेते सुनील महाजन , जि.प. सदस्य प्रतापराव पाटील , गोपाल चौधरी, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनोज चौधरी, प्रशांत नाईक , अमर जैन ,गणेश सोनवणे , श्याम कोगटा, सा. बा. विभागाचे सुभाष राऊत , शाखा अभियंता जितेंद्र महाजन , कॉन्ट्रॅक्टर राहुल सोनवणे, पं. स. सदस्य जनाआप्पा कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share post
Tags: #Divya JalgoanJalgaon newsगुलाबराव पाटीलमहामार्गाच्या नूतनीकरण
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, ७ मार्च २०२१

Next Post

अवैधरित्य वाळूची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडण्यात महसूल पथकाला यश

Next Post
अवैधरित्य वाळूची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडण्यात महसूल पथकाला यश

अवैधरित्य वाळूची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडण्यात महसूल पथकाला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group