नवी दिल्ली, वृत्तसंस्था । एकीकडे लग्नाचा हंगाम सुरू होत असताना दुसरीकडे सोन्याच्या किंमती दररोज घटत आहे. यावेळी, ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर खाली 44,400 रुपयांवर आला आहे. सोन्याच्या भावात (Gold Silver Price) घसरण होण्याचा आज भारतीय बाजारातील सलग आठवा दिवस आहे.
शुक्रवारी एमसीएक्स (MCX) वरील सोन्याचे वायदा 0.3% घसरून ते 44,400 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचे वायदे 0.6 टक्क्यांनी घसरून 65,523 रुपये प्रति किलो झाले.
मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर कित्येक महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत 44,589 वर बंद झाली.
आतापर्यंत 12000 रुपये स्वस्त:
सोने गेल्या 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले आहे, तेव्हापासून त्याची किंमत सुमारे 12000 रुपयांनी कमी झाली आहे. 2020 च्या ऑगस्टमध्ये सोने 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले.