चोपडा – चोपडा येथे दर रविवारी कृषी उत्प्पन्नं बाजार समिती मधे गुरा ढोरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो तसेच या ठिकाणी मध्यप्रदेश आणि आसपास च्या तालुक्यातुन, खेड़या पाड्या हूंन हजारों शेतकरी गुर ढोर घेऊन खरेदी विक्री साठी येतात. मात्र कोरोनाने पुन्हा थैमान घातल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार आठवड़े बाजार व गुरांचा बाजार भरणार नाही असा आदेश देण्यात आला पण प्रत्यक्षात हा आदेश शेतकऱ्यांनाच माहिती नसल्याने त्याची अंमलबजावणी शेतकऱ्यांकडून झाली नसल्याने पोलिसांनी विना मास्क तसेच गर्दी जमवल्यामुळे प्रत्येकी दोन शे रुपये दंड आकारण्यात आला.
शेतकरी मोठ्या प्रमाणात जमल्याने चोपडा शहर पोलिस स्टेशन ला कळले,आणि सहायक पोलिस निरीक्षक सांवले हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले आणि बाजार थांबवला मात्र तेव्हा शेतकऱ्यांना काहीही सूचत नव्हते त्यामुळे ते पोलिसांना पाहून गुर घेवून सैरा वैरा पळू लागले. हा प्रकार पाहून चोपडा येथील धनवाडी रस्त्यावरील भाजी विक्रेते ही घाबरून पळू लागले.
शेवटी शेतकऱ्यांपर्यंत शासनाचां अध्यादेश न पोहोचल्याने शेतकऱ्यांना गुर ढोर परत न्यावे लागले अखेर त्यांना पुन्हा वाहतूक खर्च करवा लागला. त्यांचे आतोनात हाल झाल्याचे पाहवयास मिळाले. ह्या प्रकाराने शेतकरी वर्गात भीती चे वातावरण निर्माण झाले असून शासना बद्दल ही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शेतकरी हा दोन पैसे कमविण्यासाठी आला होता अन दोन शे रुपये दंड पोलिसांना देऊन गेला शेवटी शासनाच्या नियमांमुळे तिथे आलेले शेतकरी अखेर हतबल होऊन निघून गेले.